⁠
Inspirational

तेजस्वीचे दुसऱ्या प्रयत्नात झाले आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण! वाचा तिची यशोगाथा..

UPSC IAS Success Story तेजस्वीने अनोख्या पद्धतीने तयारी करून दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. वाचा तिची यशोगाथा….

(युपीएससी) नागरी सेवा परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने केली तर कमी वेळात यश मिळू शकते. असे अनेक युपीएससीची तयारी करणारे इच्छुक आहेत जे बराच काळ गोंधळलेल्या अवस्थेत असतात.त्यांना योग्य दिशेने कसे जायचे हे माहिती नसते, अशा लोकांसाठी, IAS अधिकारी तेजस्वी राणा यांची कहाणी प्रेरणादायी ठरू शकते.

तेजस्वी राणा ही हरियाणातील कुरुक्षेत्रची आहे. तिला सुरुवातीपासूनच अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेण्याची इच्छा होती. बारावीनंतर तिने जेईई परीक्षा दिली. त्यानंतर तिने आयआयटी कानपूरमध्ये शिक्षण घेतले, त्यादरम्यान तिचा यूपीएससीकडेही कल वाढला आणि तिने तयारी करण्याचा निर्णय घेतला.

तेजस्वीने २०१५ मध्ये पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली होती. तिने प्रिलिम्स पास केली पण मेनमध्ये नापास झाली. दुसऱ्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले. यासाठी तिने प्रथम युपीएससीचा अभ्यासक्रम नीट पाहिला. नंतर इयत्ता सहावी ते बारावी मधील सर्व एनसीईआरटीच्या पुस्तकांचे वाचन केले. तिने ही पुस्तके नीट वाचली आणि तिचा पाया मजबूत केला. यानंतर तिने ऐच्छिक विषय अतिशय विचारपूर्वक निवडला. एक चांगले वेळापत्रक बनवले आणि दररोज शक्य तितका अभ्यास करून लहान नोट्स तयार केल्या. यादरम्यान तिने मॉक टेस्ट घेऊन तयारीचे विश्लेषण केले आणि उत्तर लेखनाचा सरावही केला. तिने आधीच्या प्रयत्नात ज्या चूका केल्या होत्या त्यावर तिने खचून न जाता. अशापध्दतीने मात केली. स्वतःच्या यशस्वी जीवनाचा फंडा शोधून काढला. आपण अपयशामुळे घाबरून जायला नको तर नये तर संयमाने प्रयत्न करायला हवे. हेच यावरून समजते. सध्या त्या पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहेत.

IAS तेजस्वी राणा हिचे लग्न IPS अधिकारी अभिषेक गुप्ता यांच्याशी झाले आहे.

Related Articles

Back to top button