⁠
Inspirational

पूर्णवेळ नोकरी करूनही यशनीने मिळवले प्रशासकीय अधिकारी पद ; वाचा तिची प्रेरणादायी यशोगाथा…

UPSC IAS Success Story दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, मात्र मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. काही पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर काही नोकरी सोडून अभ्यास करतात. पण यशनी पूर्णवेळ काम करून युपीएससी परीक्षेची तयारी केली. ही गोष्ट आश्चर्यदायक असली तरी खरी आहे. तिने २०१९ मध्ये ऑल इंडिया ५७वा रँक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले. तिने तिच्या चौथ्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यामागील उत्तम वेळेचे व्यवस्थापन हे कारण होते. यूपीएससीची तयारी करण्यासाठी नोकरी सोडण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त चांगल्या वेळेचे व्यवस्थापन करून कठोर परिश्रम करावे लागतील. हेच तिने दाखवून दिले आहे.

यशनी नागराजनचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय, नाहरलगुन येथून झाले तर यानंतर तिने २०१४ मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग,बी.टेकचे शिक्षण पूर्ण केले.

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना यशनी दररोज चार ते पाच तास अभ्यासासाठी देत ​​असे. इतकंच नाही तर ती आठवड्याच्या शेवटी शनिवार – रविवारी पूर्ण दिवस अभ्यास करायची. तिचा असा निश्चय होता की, तुम्ही युपीएससीची तयारी करत आहात आणि पूर्णवेळ कर्मचारी आहात, मग तुम्हाला आठवड्याच्या शेवटी अभ्यास करावा लागेल. यामुळे तुमची तयारी निश्चितच मजबूत होईल. योग्य वेळेचे व्यवस्थापन तुम्हाला अभ्यासासाठी ४ ते ५ तास घालवण्यास मदत करेल.

या परीक्षेत तिला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पण ती खचली नाही. तिने इतर लोकांच्या प्रभावाखाली भूगोल हा पर्यायी विषय म्हणून निवडला. चुकीच्या विषयामुळे, ती तिच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये चांगली कामगिरी करू शकली नाही. नंतर तिच्या लक्षात आले आणि तिने विषय बदलला. तिला यश मिळाले. याशिवाय ती सांगते की, तुम्ही तुमच्या आवडीचा विषय निवडावा म्हणजे तुम्हाला तो आवडीने वाचता येईल. विषय आवडला तर मनापासून वाचाल. युपीएससी परीक्षेत वैकल्पिक विषय महत्त्वाची भूमिका बजावतात कारण ते चांगले गुण मिळविण्यात मदत करतात. असेच तिने काही यशमंत्र लक्षात ठेवले आणि तिची आय.ए.एस पदी निवड झाली.

मित्रांनो, तुमच्याकडे आधीच नोकरी असताना तुम्ही युपीएससीमध्ये नापास झालात तरीही तुम्हाला तणाव जाणवणार नाही. स्वप्न बघत रहा… नक्की पूर्ण होतात.तुम्ही तुमच्या करिअरची फारशी काळजी करू नका. कठोर परिश्रम आणि उत्तम वेळेचे व्यवस्थापन करून तुम्ही IAS किंवा IPS अधिकारी होऊ शकता.

Related Articles

Back to top button