केंद्रिय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत बसणारे उमेदवार अहोरात्र मेहनत घेतात. तर यात अनेकजण डॉक्टर, इंजिनियर होऊनदेखील यूपीएससी परीक्षा देतात. असंच काहीस अपाला मिश्रा (Apala Mishra) यांनी केलं. डॉक्टर झाल्यांनतर यूपीएससी (UPSC) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या प्रयत्नात आयएफएस (IFS) अपाला मिश्रा यांनी UPSC क्रॅक केली.
आयएफएस अपाला मिश्रा यांचा जन्म १९९७ रोजी उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे झाला. त्या आर्मी कुटुंबात जन्माला आल्या. त्यांचे वडील अमिताभ मिश्रा हे कर्नल आहेत. त्यांचे वडील अभिलेख मिश्रा हे सैन्यात मेजर आहेत. त्यांची आई अल्पना मिश्रा या दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर आहेत.
अपाला मिश्रा यांनी १०वीपर्यंतचे शिक्षण देहारादून येथे झाले. त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण दिल्ली येथून झाले. त्यानंतर त्यांनी आर्मी कॉलेजमधून बीडीएस केले. त्यानंतर त्यांनी डेंटिस्ट पदवी प्राप्त केली. त्यांना नेहमीच समाजासाठी काही काम करायचे होते. त्यामुळे त्यांनी सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
आयएफएस अपाला मिश्रा यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. पहिल्या दोन प्रयत्नात त्या प्रिलियम्सदेखील पास करु शकल्या नाहीत. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी ९वी रँक मिळवली. त्यांनी यूपीएससी इंटरव्ह्यूमध्ये सर्वाधिक मार्क्स मिळवले होते.
आयएफएस (IFS) अपाला मिश्रा या सोशल मीडियावरदेखील फार सक्रिय आहेत. त्या परीक्षेच्या काळात ७-८ तास अभ्यास करायच्या. त्या आपल्या चुकांमधून शिकल्या. त्यांनी योग्य टाइम मॅनेजमेंट करत परीक्षा दिली आणि त्यात यशदेखील मिळवले.