आपल्यामधील कमतरता ही आपली ताकद बनली पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेनो जेफीन. बेनो जेफीन यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला, त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी आहेत आणि आई गृहिणी आहे. जन्मापासून दिसत नसलेल्या बेनो अभ्यासात अतिशय हुशार होत्या. सुरुवातीला ब्रेल लिपीत शिकल्यानंतर त्यांनी जॉब एक्सेस विथ स्पीच सॉफ्टवेअरचा वापर केला.
त्यांना शिक्षणाची आवड असल्याने अभ्यासाचा ध्यास उराशी बाळगून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. अवघ्या त्यावेळी त्यांचं वय अवघं २५ वर्षे होतं. त्यांनी इंग्रजी साहित्यात डॉक्टरेट केलं होतं आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून काम केलं आहे. बेनो यांना जन्मापासूनच दिसत नव्हतं. तरी त्यांनी सॉफ्टवेअरच्या मदतीने हळूहळू अभ्यास करायचा. स्पर्धा परीक्षेची तयारी पण अशीच केली. त्यांनी सर्व पुस्तके ऐकून वाचली असं म्हणता येईल. खरंतर हा प्रवास सोपा नव्हता.
पण त्यांनी करून दाखवले. २०१५ मध्ये त्यांनी इंडियन फॉरेन सर्व्हिस ज्वॉईन केली आहे. २०१३ मध्ये बेनो यांनी यूपीएससी प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर जून २०१४ मध्ये त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली. ३४८ रँक मिळवला होता. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. बेनो या भारतातील पहिल्या दृष्टिहीन IFS अधिकारी आहेत.