अपयशाला खचून न जाता हिमतीने लढले ; परभणीच्या सुमंतची IFS परीक्षेत बाजी !
UPSC Success Story : कोणतीही परीक्षा म्हटलं की यश – अपयश या सोबत सामना करायला लागतोच. पण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता. त्यातून शिकून यशाचा मार्ग काढायला हवा. सुमंत साळुंके यांनी देखील हेच अवलंबले. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. अत्यंत सामान्य घरातील मुलगा…पण त्याची जिद्द खूप होती.
सुमंत हा मूळचा परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील कुपटा या गावचा रहिवासी. त्याचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. त्यानंतर त्याने सांगली येथे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०२१ मध्ये बी.टेक पदवी मिळवली.
मूळात त्याला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. त्यामुळे पदवी शिक्षण झाल्यावर त्याला नोकरीच्या बऱ्याच संधी होत्या. पण त्या वाटेवर न जाता. त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली.याच निर्धाराने तो पुण्यात गेला. तिथे राहून त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.लगेच दोन वर्षांनी त्याने २०१४ मध्ये आय.एफ.एसची परीक्षा दिली. पण कारणास्तव त्याची संधी गेली. त्याने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. हार न मानता २०१५ला पुन्हा एकदा परीक्षा दिली. यावेळी आधी झालेल्या चूकांवर लक्ष देऊन त्यावर उपाय शोधला. त्यामुळेच सर्वसामान्य कुटुंबातील सुमंत सोळंके याने जिद्दीच्या बळावर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) या परीक्षेत देशात तिसरा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळविला.