UPSC IPS Success Story काहीवेळा एखाद्याला अगदी लहान वयातच वाईट परिस्थितीचा अनुभव घ्यावा लागतो. अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे IPS अंशिका जैन.
अंशिका ही मूळची दिल्लीची राहणारी लेक. अवघ्या ५ वर्षांची असताना आई – वडील गेले. हक्काचा आधार गेला. त्यानंतर, तिचे संगोपन तिच्या आजी आणि काकांनी केले. ज्यांना ती तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधारस्तंभ मानते. तिची आजीची इच्छा होती की तिने सिव्हिल सर्व्हंट व्हावं आणि अंशिकाने ते पूर्ण करायचं ठरवलं. तिला वेळोवेळी प्रोत्साहन केले आणि शिक्षणासाठी पाठिंबा देत उच्च शिक्षित केले.
त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमध्ये बी.कॉम नंतर एम.कॉमच्या काळात यूपीएससीची तयारी सुरू केली. तिच्या पदवीनंतर, तिने देशातील सर्वात मोठ्या एम.एन.सीमध्ये चांगली नोकरी मिळविली. परंतू तिने ती नाकारली आणि तिची CSE तयारी सुरू ठेवण्याचे निवडले. दुर्दैवाने, अंशिकाने २०१९ मध्ये तिची आजी देखील गमावली.
जेव्हा ती युपीएससीची तयारी करत होती.ज हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. पण तिने आपले प्रयत्न चालू ठेवले. पण तिने स्वत:ला आठवले, चिकाटी धरली आणि पुन्हा एकदा तिची तयारी सुरू केली.अंशिका स्वयं-अभ्यासावर विसंबून राहिली. परंतू चार प्रयत्नांत ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत राहिली. शेवटी, तिची मेहनत फळाला आली. ती पाचव्या प्रयत्नात २०२२ मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवा अधिकारी बनली.