⁠  ⁠

दुसरीही मुलगी झाली म्हणून घरच्यांनी नकारले, पण आरती मोठ्या संघर्षातून झाल्या IPS अधिकारी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC IPS Success Story समाजात अजूनही मुलीला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडावे लागते. लहानपणी आरतीला यांना देखील दुसरी मुलगी म्हणून नाकारण्यात आले. पण त्यांनी हिंमतीने आयपीएस अधिकारी होऊन दाखवले. डॉ. आरती सिंह ह्या मिर्झापूरच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आहेत. दुसरीही मुलगी झाली म्हणून घरच्यांनी नाके मुरडली. त्यांच्यासाठी नकोशी होते. तेव्हा मुलीचा जन्म म्हटला की तिच्या सुरक्षेपासून हुंड्यापर्यंतची काळजी. जन्मापासूनच खडतर प्रवास सुरू झाला. सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत शिक्षण, वाचनाला आपलेसे केले. चांगले शिक्षण घेत एमबीबीएस बनले.

त्या महिलांविरोधी विचारांमुळे अस्वस्थ होत्या. म्हणूनच त्या रुग्णालयात लेबर वॉर्डमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झाल्या. तिथेही मुलगी झाली तर होणारे दुःख आणि मुलगा झाला, तर होणारा जल्लोष आणखी अस्वस्थ करू लागला. प्रसूतिकळांऐवजी मुलीला जन्म दिल्याने आई रडायची. मुलगी झाली की तिची सुरक्षा, हुंडा असे अनेक प्रश्न तिच्यासमोर येत. या हीन वागणुकीविरुद्ध काही करण्याची धडपड सुरू झाली. मात्र डॉक्टर म्हणून मर्यादा होत्या. महिलांना सुरक्षित वाटावे, अत्याचार कमी व्हावेत म्हणून आयपीएस होण्याचे ठरवले. तेथूनच आयुष्याला कलाटणी मिळाली.

त्यावेळी त्यांनी शिक्षणासाठी एकटीने दिल्ली गाठले. स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. दुसऱ्यांदा त्याच जोमाने प्रयत्न सुरू होते. त्यांतही अपयश आले. थांबायचे नाही, म्हणून सुरू असणाऱ्या प्रयत्नांना अखेर तिसऱ्यांदा यश मिळाले आणि त्या आयपीएस झाले. त्यांची पहिलीच पोस्टिंग गडचिरोलीत अतिदुर्गम भामरागड येथे झाली. जिथे पुरुष अधिकारीही त्यावेळी काम करण्यासाठी घाबरायचे.

तेथे पहिली महिला आयपीएस म्हणूनरुजू झाले. मात्र नक्षल चळवळ आक्रमक असल्याने तेथील संवेदनशील वातावरणात एसटीतून प्रवास सुरू होता. अगदी गर्भवती असतानाही त्यांनी काम चालू ठेवले. पुढे कोरोनाकाळात मालेगाव पेंटर्न यशस्वी झाला. या साऱ्या धडपडीची आंतरराष्ट्रीय ‘फोब्र्स’ मासिकांनेही दखल घेतली आहे.

Share This Article