UPSC IPS Success Story : कधीकधी स्वप्नांना बळ देण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील गोष्टी ह्या परिणामकारक ठरतात. तसेच,मनोज रावत यांनी बॉलिवूड चित्रपटामधून प्रेरणा घेऊन कॉन्स्टेबल ते आयपीएस अधिकारी बनण्याचा प्रवास पूर्ण केला आहे. मनोज हे मूळचे राजस्थानच्या जयपूर येथील श्यामपूर गावचे रहिवासी आहेत. मनोज यांचे वडील एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. काही कारणाने त्यांच्या वडिलांची नोकरी केली… त्यामुळे आर्थिक संकट उभे राहिले.
त्यात ते मोठे असल्याने कुटुंबातील तीन भावंडांसह जबाबदारी स्वीकारली….अवघ्या १९ व्या वर्षी नोकरी करायला सुरुवात केली. मनोज शिकत असताना त्यांना एकदा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) नोकरीची संधी मिळाली होती. मात्र, त्यांनी ही संधी नाकारली. कारण त्यांना आयुष्यात यापेक्षा काहीतरी मोठं करायचं होतं.मनोज यांनी मेहनत केली आणि परीक्षा दिली आणि ते राजस्थान पोलिसात कॉन्स्टेबल पदावर भरती झाले.
त्याचवेळी त्यांनी नोकरीसोबतच अभ्यासही सुरू ठेवला. यानंतर त्यांनी राज्यशास्त्रमधून MA पूर्ण केले. २०१३ साली त्यांची कोर्टात लिपिक म्हणून निवड झाली. अशा परिस्थितीत त्यांनी हवालदार पदाचा राजीनामा दिला लिपिकाच्या नोकरीत ते रुजू झाले. या सगळ्या ताणतणावातून मनोरंजनासाठी ते बरेच चित्रपट बघत असतं. त्यामुळे, त्यांना देखील वाटू लागले की आपण चित्रपटात दाखवतात तसं अधिकारी व्हायला हवं… म्हणून त्यांनी पुन्हा युपीएससीचा अभ्यास सुरू केला.
नोकरी करत असताना हा युपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास सुरु ठेवला आणि त्याबरोबरच कुटुंबाचीही जबाबदारी उत्तम तऱ्हेने पेलली. अखेर, या संपूर्ण मेहनतीला यश आले.भारतातून ५४४ व्या क्रमांकासह यश संपादन केले. यामुळे त्यांना आयपीएस अधिकारी होण्याची संधी मिळाली.