---Advertisement---

गुरं राखण्यासोबत केला अभ्यास; प्रेमसुख देलूने घेतली आयपीएस पदी झेप !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IPS Success Story : खरंतर आयुष्यात अनेक आव्हाने आल्यावर आयुष्यातील जिद्द कमी होत जाते.‌ पण परिस्थिती बरोबर सामोरे जाऊन यशाची आणि अभ्यासाची कास धरता आली पाहिजे. याचे उदाहरण म्हणजे प्रेमसुख देलू . सामान्य आणि शेतकरी कुटुंबात जन्मलेला प्रेमसुख.राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील नोखा तहसीलमधील रायसर नावाच्या एका छोट्या गावातील लेक.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते कुटुंबाला हातभार लागावा यासाठी काम देखील करत होता. एवढेच नव्हेतर लहानपणी गुरे पाळण्याचे काम करायचे. गुरे राखण्यासोबतच त्यांचा अभ्यास सुरू होता. शिक्षणाची कास कायम ठेवली. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर खर्च भागत नव्हता. यासाठी त्यांचे वडील उंटाची गाडी चालवत आणि शेतीची साधने घेऊन जातं होते. पण आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे यासाठी त्याची धडपड सुरू होती.

आता ही परिस्थिती बदलण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी त्याने युपीएससी परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.प्रेमसुख यांनी काही काळ शिक्षण विभागात शालेय अधिव्याख्याता म्हणून काही काळ काम केले आहे. त्यांचे स्वप्न आणखी मोठी ध्येय साध्य करण्याचे होते. प्रेमसुख यांनी सहा वर्षात १२ सरकारी नोकऱ्या मिळवल्या. सुरुवातीला त्यांची बिकानेरमध्ये पटवारी म्हणून नियुक्ती झाली होती, पण त्यांना मोठे यश मिळवायचे होते म्हणून त्यांनी इतर स्पर्धा परीक्षा दिल्या.

त्यानंतर राजस्थान पोलिसात उपनिरीक्षक पदासाठी निवड होऊनही त्यांनी हे पद न स्वीकारता राजस्थान सहायक कारागृह तुरुंग परीक्षेत यश मिळवून सहाय्यक जेलरच्या नोकरीला प्राधान्य दिले. पुढे त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. पुन्हा युपीएससी परीक्षेत यश मिळवले. संपूर्ण भारतातून १७० वी रॅंक प्राप्त केली आणि ते IPS अधिकारी बनले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts