प्रेमसुख देलू यांचा गाई चरवण्यापासून ते आयपीएस अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास वाचा
प्रेमसुख देलू यांची आर्थिक परिस्थिती ही तशी बेताचीच होती.त्यांचे वडील शेती व उंटाची गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. ते देखील त्यांच्या कामात मदत करायचे.
प्रेमसुख हे मूळचे राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील नोखा तहसीलमधील रायसर नावातील रहिवासी.अनेक आर्थिक अडचणी असूनही त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले. त्यांचे शालेय शिक्षण हे गावातीलच शाळेत झाले. नंतर बिकानेरच्या सरकारी डुंगर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तेथून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. याच दरम्यान त्यांनी इतिहास विषयातील यूजीसी नेट आणि जेआरएफ या परीक्षादेखील उत्तीर्ण केली. प्रेमसुख यांनी २०१० मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि पटवारी भरती परीक्षा उत्तीर्ण करून यशाचा पहिला टप्पा गाठला.
त्यांना पटवारी, स्थानिक सरकारी जमीन अभिलेख अधिकारी बनण्याची परवानगी मिळाली. मात्र, ते एवढ्यावरच थांबले नाहीत. पटवारी म्हणून काम करतानाच त्यांनी आपला अभ्यासही चालू ठेवला होता.पटवारी म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर त्यांनी राजस्थान ग्रामसेवक परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला. मग नंतर राजस्थान पोलिसांत उपनिरीक्षक पदासाठी त्यांची निवड झाली. त्यांनी लहानपणी गरिबी अगदीच जवळून पाहिली होती. अशा कारण- आपले लक्ष्य पूर्ण केल्याने आपण कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढू शकतो हे त्यांना वेळीच कळले होते. सहा वर्षांत प्रेमसुख यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासह जवळजवळ १२ वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्या केल्या. आयपीएस प्रेमसुख देलू यांचा गाई चरवण्यापासून ते आयपीएस अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास हा अनेकांचा प्रेरणादायी आहे.