UPSC IPS Success Story : स्पर्धा परीक्षा म्हटलं की अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. ज्यांचे ध्येय उराशी पक्के आहे, दृढ निश्चय आहे ते सर्वात कठीण अडथळ्यांनाही पार करू शकतात.अशाच एका ध्येयवादी महिला अधिकारी यांची ही यशोगाथा नक्की वाचा.आयपीएस एन. अंबिका यांनी यशोकथा जणू यशाच्या इतिहासात कोरली आहे. त्यांनी असंख्य अडचणींवर मात करत स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले. त्यांचा अवघ्या वयाच्या १४व्या वर्षी लग्न झाले. त्यांना या काळात खूप त्रास सहन करावा लागला.लहान वय, घराची जबाबदारी हे सारे सांभाळणे अवघड जात होते.त्या वयाच्या अठराव्या वर्षी, ती दोन मुलींची आई बनल्या होत्या.लग्नाची चार वर्षे नैराश्यातच गेली. करत होती. कठीण परिस्थितीमुळे खचून न जाता, त्यांनी जीवनातील वाट शोधली.
एकदा अंबिका स्वातंत्र्य दिनी होणारी परेड पाहायला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या पतीला एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ‘सॅल्यूट’ करताना पहिले. ते कोण होते? आणि आपल्या पतीने त्यांना अभिवादन का केले?, असा प्रश्न अंबिका यांना पडला. यावर त्यांच्या पतीने त्यांना सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर आयपीएस अधिकारी होण्यासाठी सिव्हील सर्विसेसची परीक्षा द्यावी लागते, हे देखील त्यांनी सांगितले. याचवेळी आपण ही अशी परीक्षा द्यायची आणि अधिकारी व्हायचं, असा निश्चय अंबिका यांनी केला. तिच्या IPS प्रवासाची सुरुवात प्रजासत्ताक दिनाच्या परेडपासून झाली, असे म्हणायला हरकत नाही.
तिचे लवकर लग्न झाल्यामुळे शाळा देखील सुटली होती. पण त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला.त्यांनी एका खाजगी कोचिंग क्लासमधून दहावीचे शिक्षण पूर्ण केले.
यानंतर डिस्टंस लर्निंगच्या माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हे सगळं सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला आयपीएस अधिकारी बनण्याची तयारी देखील सुरु होती. त्या आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी चेन्नईला स्थलांतर झाल्या. या काळात त्यांच्या पतीने स्वतःची व्यावसायिक कर्तव्ये पार पाडत त्यांच्या मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानागरी सेवा परीक्षेत तीनदा नापास झाल्याने अंबिकाच्या पतीने तिला घरी परतण्याचा सल्ला दिला.
त्या शेवटच्या प्रयत्नापर्यंत मेहनत घेत राहिल्या. अखेर, या प्रयत्नांना यश आले. मध्ये, तिच्या चौथ्या प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. २००८ मध्ये अंबिका परीक्षेत उत्तीर्ण होऊन ‘आयपीएस अधिकारी’ बनल्या. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर अंबिका यांना महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग मिळाली