---Advertisement---

वयाच्या २३व्या वर्षी बनला आयपीएस अधिकारी ; वाचा नवनीतच्या जिद्दीची कहाणी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IPS Success Story : चांगले शिक्षण घेतले की आयुष्याची व भविष्यातील जडणघडण चांगली होते. यासाठी जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणे प्रयत्न महत्त्वाचे असतात. नवनीत आनंद हा शेतकरी कुटूंबात वाढलेला लेक…घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला तिसरी पासून सैनिक शाळेत घातले.

त्यामुळे सैनिक शाळेत असणारी शिस्त आणि जडणघडण या वातावरणाचा‌ त्याच्यावर चांगला परिणाम झाला. त्याच्या आयुष्यात चित्तौडगड सैनिक शाळेची महत्त्वाची भूमिका आहे. पुढे त्याने दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केली आणि इतर सरकारी भरती परीक्षांची सुध्दा तयारी सुरू केली. या दरम्यान अपघातात त्याच्या वडिलांना गमावलं. या धक्कादायक प्रकारानंतर कौटुंबिक जबाबदारीचा भार त्याच्या आईच्या खांद्यावर आली. पण आईने त्याला पूर्णतः पाठिंबा दिला.त्याने अहोरात्र मेहनत करून विविध प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या.

सीडीएस, नेट जेआरएफ पुढे वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी सीआयएसएफमध्ये (CISF) असिस्टंट कमांडंट पद मिळवले. यानंतर त्याने 2023 मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी तिसऱ्या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा पास केली. यामध्ये नवनीतने ४९९वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे त्यांचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts