⁠
Inspirational

परदेशातील नोकरी सोडली आणि स्पर्धा परीक्षेचा घेतला ध्यास ; पूजा झाली आयपीएस !

UPSC IPS Success Story : आपल्याला भविष्यात काहीतरी करून दाखवायचे आहे. या विचाराने पूजाने आपल्या आयुष्यात बदल करायला सुरुवात केली.पूजा यादवची घरची आर्थिक परिस्थिती तशी फार काही चांगली नव्हती. यूपीएससी परीक्षेच्या तयारीचा खर्च करता यावा यासाठी त्यांनी लहान मुलांच्या शिकवण्या घेतल्या. तसेच रिसेप्शनिस्टची नोकरीही केली.

पण त्याआधी तिला परदेशातही नोकरी मिळाली होती. पूजा ही हरियाणातील लेक. तिचे गावातच शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर तिने बायो टेक्नोलॉजी आणि फूड टेक्नोलॉजीमध्ये एम.टेक पूर्ण केले. या उच्च शिक्षणाच्या जोरावर तिला परदेशात नोकरी देखील मिळाली. पण यात तिचे मन काही रमले नाही.

काही काळ काम केल्यानंतर तिला लक्षात आले की आपल्या देशातील लोकांचा विकास करण्यासाठी धडपडले पाहिजे. त्यानंतर ती नोकरी सोडून परत गावी आली. मग युपीएससीचा अभ्यास केला. या काळातील खर्च भागविण्यासाठी तिने लहान मुलांचे क्लास देखील घेतले‌. पण जिद्दीने अभ्यास करत राहिले.

अखेर, या मेहनतीला यश आले. दुसऱ्याच प्रयत्नात तिने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. तिला रँक १७४ मिळाला असून त्या गुजरात केडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.एखादी गोष्ट करायची ठरवल्यास माणूस कोणत्याही परिस्थितीत आपले स्वप्न साकार करतो. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे.

Related Articles

Back to top button