⁠  ⁠

सिक्युरिटी गार्डचा मुलगा झाला IRS अधिकारी ; वाचा कुलदीपची प्रेरणादायी यशोगाथा !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC IRS Success Story एका छोट्याश्या गावात जडणघडण होऊन देखील उच्च पद मिळवणे ही काही सोपी गोष्ट नाही. पण कुलदीप याने करून दाखवले. कुलदीप द्विवेदी याने युपीएससीच्या परीक्षेत २४२वा क्रमांक पटकावला. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबात वाढलेल्या कुलदीप द्विवेदी यांनी आपलाअभ्यास कधीच कमी पडू दिला नाही.

कुलदीप द्विवेदी हा उत्तर प्रदेशातील निगोह जिल्ह्यात शेखपूर नावाच्या एका छोट्या गावातील रहिवासी. त्याचे वडील, सूर्यकांत द्विवेदी, लखनौ विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या पाच जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हा संघर्ष करत आहेत. स्वत:च्या आर्थिक अडचणी असूनही सूर्यकांत यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी व अधिकारी बनण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी आपल्या मुलाच्या ध्येयांना नैतिक आणि आर्थिक अर्थाने पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.लहानपणापासून शासकीय सेवेत येऊन काम करावे हे त्याचे स्वप्न करण्यासाठी मोठा आधार दिला.

२००९ मध्ये त्याने अलाहाबाद विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर कुलदीपने २०११ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्याने दाखवून दिले की सर्वात महत्त्वाचे गुण म्हणजे परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थितीत धैर्य व चिकाटी टिकून ठेवणे. पुढे कुलदीप याने अलाहाबादमध्ये राहत असताना कुलदीपने यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यावेळी त्याच्याकडे भ्रमणध्वनी नसल्यामुळे तो पीसीओद्वारे कुटुंबियांशी बोलत असे. २०१५ मध्ये कुलदीप युपीएससी परीक्षेला बसला. तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला, त्याने २४२ वा क्रमांक मिळवला. यशस्वी होण्याच्या माणसाच्या इच्छेला कोणताही अडथळा रोखू शकत नाही, अगदी खरे आहे. हे कुलदीपने दाखवून दिले.

Share This Article