अखेर स्वप्न झाले पूर्ण; इस्लामपूरच्या अजिंक्य झाला IPS अधिकारी!
UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत इस्लामपूरच्या अजिंक्य माने यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्याने स्पर्धा परीक्षा – UPSC करायचे हे काही लहानपणी पाहिलेलं स्वप्न होते असं काही नाही पण वेळोवेळी अपयश आल्याने त्याला स्वतःला सिद्ध करायचं होते. त्याच्या मनात वर्षोनुवर्षे एक अपयशीपणाची भावना होती.त्या अपयशाचे ओझे कायमचे दूर करून टाकायचे होते. म्हणूनच अजिंक्यने UPSC करायचे ठरवले आणि स्वतःला अभ्यासात झोकून दिले.
अजिंक्य माने यांचे मूळ गाव नेर्ले (ता. वाळवा) हे आहे.
अजिंक्यचे माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात आदर्श बालक मंदिर येथे झाले. तर बी. ई. मेकॅनिकल आर. आय टी राजारामनगर येथे झाले आहे. त्याने एम.टेक ही पूर्ण करून काही वर्षे नोकरीही केली होती. अजिंक्य याचे आई-वडील शिक्षक आहेत. एक भाऊ यूपीएससीच्या घेण्यात आलेल्या इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. दुसरे बंधू जर्मनीत मोठ्या कंपनीत अधिकारी आहेत.
त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो पुण्यात जॉबला असताना त्याला वाटले की, ‘मी जे काम करतोय त्यात माझा मन नाही लागत, मी समाधानी नाही’ म्हणून त्याने ठरवलं की UPSC स्पर्धा परीक्षेचे प्रयत्न करू, नाही झालं तर परत खाजगी क्षेत्रात नोकरी करू.
असा अजिंक्य स्पर्धा परीक्षेच्या जगात अचानक आला. त्याची २०१९ मध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये prelims नाही निघाली कारण, सराव आणि अभ्यास पध्दत चुकली होती. पुन्हा पुन्हा अभ्यास करत राहिला आणि तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे.अभ्यासक्रमाचा सातत्यपूर्ण सखोल अभ्यास, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नाची जाण, विशेष करून ऑप्शनल विषय (समाजशास्त्र ) याचा अधिक गंभीरपणे केलेला अभ्यास यामुळे यश प्राप्त झाले, अखेर ४२४ रॅंकसह तो IPS झाला.
अभ्यासाने आयुष्य नक्कीच बदलू शकते हे अजिंक्यने दाखवून दिले.