---Advertisement---

अपयशातून मार्ग मिळतोच ; आकाशने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत भारतातून पहिला नंबर मिळविला!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

युपीएससी ही अशी परीक्षा आहे…जिथे प्रत्येकजण आपापल्या परीने घडत असतो. कोणी पास होते तर कोणी नापास….काहींना पहिल्या प्रयत्नात यश मिळते. तर काहींना खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. आकाश बऱ्याचदा या परीक्षेत नापास झाला. पण अपयशातून शिकत गेला. तो आणि त्याचे मित्र अनेक वेळा परीक्षेत नापास झाले; पण त्यांनी कधीच हार मानली नाही.‌

आपल्या झालेल्या चूकांवर सुधारणा करत यशाची शिखरे गाठली. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील आकाश राज याने केंद्रीय लोकसेवा आयोग कनिष्ठ अभियंता (JE) सिव्हिल परीक्षेत ऑल इंडिया रँक (AIR) 1 मिळवला आहे. आकाश राजची आई सरिता देवी महाविद्यालयात शिक्षिका आहेत. तर त्याचे वडील वीरेंद्र कुमार बिहारच्या पूर्णिया येथील आरकेके कॉलेजचे प्राचार्य आहेत.

आकाश हा लहानपणापासून हुशार असल्याने त्याच्यासह घरच्यांची अधिकारी होण्याची इच्छा होती. २०१८ मध्ये बंगळुरू कॉलेजमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग (BE EEE) मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यानंतर त्याला पाच लाखांच्या पॅकेजची नोकरी मिळाली. पण, त्याला त्या कामात फारसा रस नसल्यामुळे त्याने ती नोकरी सोडली. त्यानंतर त्याने पश्चिम बंगालच्या केंद्रीय विद्यालय संघटनेत काम करण्यास सुरुवात केली.

युपीएससीसाठी २० जागा रिक्त झाल्याचे कळताच त्याने ८ एप्रिल रोजी फॉर्म भरला. त्यानंतर दिवस-रात्र अभ्यास करून त्याने परीक्षेची उत्तम तयारी केली. ८ ऑक्टोबर रोजी तो परीक्षेला बसला आणि काही दिवसांत निकाल लागला. यात आकाश राजने यूपीएससी, जेई परीक्षेत संपूर्ण भारतात पहिला क्रमांक पटकावला आहे. आकाशची ही कामगिरी केवळ त्याचे कुटुंब, नातेवाईक आणि समाजासाठीच नाही, तर अशा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आदर्शवत अशी आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts