⁠  ⁠

सलग चारवेळा नापास, पण आईच्या प्रोत्साहनाने पाचव्या प्रयत्नात मिळविले यश

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC Success Story यूपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व तरुणांनी यश मिळवायचे असेल तर स्वत:वर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. नागरी सेवेच्या तयारीसाठी परीक्षेचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुमची तयारी पक्की झाली की स्वतःच्या चूका टाळण्यास मदत होते.कधी कधी यश उशिरा मिळते पण जेव्हा मिळते तेव्हा मनाप्रमाणे मिळते. अशीच एक अक्षत कौशल यांच्या यशाची कहाणी आहे.

अक्षत हे मूळचे हरियाणाचे असून यांना लहानपणापासूनच अधिकारी व्हायचे ठरवले होते. त्यासाठी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर ते तयारी करत होते पण एक वेळ अशी आली जेव्हा त्याला वाटले की त्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. परीक्षेच्या तयारीसाठी अक्षतने अहोरात्र मेहनत घेतली. लोक त्याची खिल्ली उडवू लागले.चार वेळा अंतिम निकालात नाव न आल्याने अक्षत कौशल खूप निराश झाले होते.

नागरी सेवेची परीक्षा कदाचित आपल्या नशिबात नाही. अशा विचार चालू केला होता.अक्षत कौशलने २०१२ पासूनच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. २०१३मध्ये तो पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षेला बसला पण तो नापास झाला. त्यानंतर अक्षतने या परीक्षेसाठी अधिक मेहनत सुरू केली. मात्र, दुसऱ्या प्रयत्नातही तो अपयशी ठरला.

त्याचप्रमाणे उत्कृष्ट तयारी करूनही तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नातही तो परीक्षा पास करू शकला नाही. अक्षत कौशलला सलग चार अपयशांना सामोरे जावे लागले. अशा स्थितीत त्याची निराशा होणे स्वाभाविक होते. त्याच्या आईनेही त्याला प्रोत्साहन दिले. तेव्हा प्रीलिम्सला अवघे १६ दिवस शिल्लक होते. २०१७ मध्ये अक्षतने या १६-१७ दिवसांत परीक्षेची तयारी केली आणि पाचव्या प्रयत्नात ५५वा ऑल इंडिया रँक मिळवला. यामुळेच, त्यांचे आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

Share This Article