⁠  ⁠

पहिल्या प्रयत्नातील चूका सुधारून दुसऱ्यावेळी केला दुप्पट अभ्यास; अंकिता झाली IAS अधिकारी!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC Success Story अंकिता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिला स्वतंत्र आणि स्वावलंबी राहायला आवडायचे. त्यामुळे, तिची विचार करण्याची पध्दत आणि अभ्यासू वृत्ती ही इतरांपेक्षा नक्कीच वेगळी होती. तिचा IIT ते IAS हा प्रवास प्रेरणादायी आहे. खरंतर आपल्याला वाटते तेवढे आयुष्य हे सुरळीत चालत नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी चालू असतात.

तसेच अंकिता देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती, याच दरम्यान तिच्या आईला एका अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. अंकिताला याचा मोठा धक्का बसला. तिची मानसिक स्थिती डगमगली आणि अभ्यासात काही मन रमेना. त्यावेळी अंकिताच्या वडिलांनी तिला पूर्ण साथ दिली आणि प्रोत्साहन दिले. अंकिताचे वडील साखर कारखान्यात अकाऊंट आहेत तर तिची आई गृहिणी होती.

अंकिताचे शालेय शिक्षण शिक्षण इंडस पब्लिक स्कूल, रोहतकमधून केले. तेथून बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेत असतानाच तिने IAS होण्याचे ठरवले होते आणि त्यानुसार अभ्यास सुरू केला होता. मात्र पदव्युत्तर पदवी पूर्ण होईपर्यंत तिने अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केले.

अंकिताने IIT दिल्लीतून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. यानंतर ती पूर्णपणे IASच्या तयारीत गुंतली होती.अंकिताने पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा ती परीक्षा पास होवू शकली नाही.पहिल्यांदा झालेल्या चूका सुधारून दुसऱ्यावेळी दुप्पट अभ्यास केला. तिने अभ्यासाची रणनीती बदलली आणि पुन्हा परीक्षा दिली. या यशाचे फलित म्हणून २०१८ च्या परीक्षेत अंकिताला संपूर्ण भारतातून १४वा रँक मिळाला होता आणि IAS बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले.

IAS अंकिता चौधरीचे कुटुंब अत्यंत साधे आणि मध्यमवर्गीय असले तरी तिची तयारी प्रामाणिक होती. त्यामुळे तिला हे यश संपादन झाले आहे.

Share This Article