---Advertisement---

वडील रिक्षाचालक म्हणून लोकांनी हिणावले, पण पोरांने IAS अधिकारी होऊन वडिलांचे नाव रोशन केले..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : लहानपणापासून गरीबी वाट्याला आली होती. त्यात हक्काचा आधार गेला. आईच्या निधनानंतर गोविंद यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलांचे उत्तमरीत्या पालनपोषण केले. गोविंद यांची आईदेखील खूप आजारी असायची. त्यांच्यावरील उपचारांसाठी भरपूर पैसे खर्च व्हायचे. त्यामुळे अनेकदा गोविंद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुकी भाकरी खाऊन दिवस काढले. गोविंद लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले.

आता पुढे काय करावे? हा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांसमोर होता. गोविंद जयस्वाल हे मूळचे उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी. त्याचे वडील रिक्षा चालक होते. त्यामुळे, रिक्षा चालवतात हे कळल्यावर मित्राच्या वडिलांनी गोविंदचा खूप अपमान केला.त्यात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. त्यामुळे लहानपणापासूनच गोविंद यांना अनेक अडचणींचा सामना करीत आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. पण त्याने शिक्षणाची कास सोडली नाही. त्याने पदवी शिक्षण झाल्यानंतर युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. संघर्षमय प्रवासाला त्यांच्या वडील आणि बहिणींची नेहमी साथ होती.

यामुळे, त्याला शिक्षण करताना अधिक पाठिंबा मिळाला. तो स्पर्धा परीक्षेची तयारी अधिक चांगली करू शकला. या कष्टाचे फळ मिळाले आणि तो आयएएस अधिकारी झाला. पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts