---Advertisement---

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2024 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यातून 1009 यशस्वी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये यवतमाळच्या एका रिक्षाचाकाच्या लेकीने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. यूपीएससी परीक्षेत तिने १४२वी रँक मिळवली आहे.

यवतमाळ शहरातील कळंब चौक परिसरातील ऑटो चालक अश्फाक शाज यांची मुलगी आबेदा आनम हिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 142 वी रँक मिळविली आहे. आबेदा हिने शहरातील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील अबाधी इनामदार सिनिअर कॉलेजमधून पदवीचे शिक्षण केले.

---Advertisement---

पुढील शिक्षणासाठी दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी येथे गेली. लहानपणापासून तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले होते. या स्वप्नाला सत्यात उतरवत तिने देशातून 142 वी रँक मिळविली.ती आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षकांना देत आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts