अनाथाश्रलयात राहून शिक्षणाचा घेतला ध्यास आणि मोहम्मद झाले आय.ए.एस अधिकारी !
UPSC Success Story : आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून जगले की यशाची पायरी गाठता येते. हेच मोहम्मद अली शिहाब यांनी करून दाखवले आहे. त्यांचा टोपल्या विकण्यापासून ते भारताचा अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांचा जन्म हा मल्लापुरम जिल्ह्यातील एडवन्नापारा येथील एका गावात झाला. घरची परिस्थिती ही बेताची….त्यात लहान वयातच वडिलांबरोबर काम करावे लागले.
तसेच १९९१ मध्ये त्यांच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईकडे कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी पुरेसे पैसे, चांगली नोकरी नव्हती. त्यामुळे शिहाब यांच्या आईने त्यांना अनाथाश्रमात पाठवले. शिहाबने या अनाथाश्रमात अनाथ मुलांसोबत १० वर्षे राहिले. या काळात त्यांनी वाचन आणि अभ्यास सुरू केला. स्वप्न साकारणाऱ्यांसाठी परिस्थिती अन् वय कधीही आड येत नाही.
हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी २१ वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्यांनी वन विभागात शिपाई, कारागृह वॉर्डन व रेल्वे तिकीट परीक्षक म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश आले. तरीही ते हार न मानता प्रयत्न करीत राहिले. २०११ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण करून ऑल इंडिया २२६ वी रँक मिळवून आय.ए.एस झाले.