---Advertisement---

आधी सीए….आता UPSC परीक्षेत यश ; वाचा समीक्षाचा अनोखा प्रवास!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : समीक्षा ही लहानपणापासून अत्यंत हुशार मुलगी. ती मूळची ठाण्यातील रहिवासी. तिचे आई-वडीलांप्रमाणे शासकीय अधिकारी म्हणून काम करायचे स्वप्न होते. ते अखेर पूर्ण झाले.समीक्षाचे वडील रेल्वे अधिकारी असून आई सेंट्रल जीएसटी अधिकारी आहेत. एकुलती एक असलेली समीक्षा म्हेत्रे. ती २०१९ मध्ये सीए झाली.सीए परीक्षा पास झाल्यानंतरच तिने यूपीएससी परीक्षा देण्याचं ठरवलं. २०१६ मध्ये तिने वडील आणि काकांच्या पाऊलावर पाऊल टाकत यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्धार केला होता.

आपल्या वडील आणि काका यांच्याप्रमाणे तिने ही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती सीए परीक्षेत उत्तीर्ण झाली मग तिने २०२० मध्ये पहिल्यांदा, २०२१ मध्ये दुसरी आणि २०२२ मध्ये तिसरी अशा सलग तीन वर्ष तिने यूपीएससी परीक्षा दिल्या. या तीनही वर्षात तिच्या पदरी निराशाच आली.पहिल्या काही टर्ममध्ये प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन अपुरे पडल्याचं लक्षात आलं.

त्यानंतर तिने अभ्यास कसा करायचा याबाबत तिने ऑनलाइन सर्च करण्यास सुरूवात केली. पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.‌ ती दिवसाला किमान आठ तास तरी अभ्यास करायची. या संपूर्ण मेहनतीच्या जोरावर तिने या परीक्षेत ३०२ क्रमांक पटकावला आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts