एका लहान गावातील तरूण देशाच्या सेवेसाठी पुढे येतो. ही खूप मोठी गोष्ट आहे.शिशीर घोंगटे हा तालुक्यातील आव्हा येथील रहिवासी आहे. त्याचे वडील प्रा. गजानन घोंगटे हे वनोजा ता. मंगरूळपीर येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात प्राध्यापक असून, त्याची आई कल्पना घोंगटे या कळुबाई कन्या विद्यालयात सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
शिशीरला अभ्यासाबरोबरच विविध खेळांची देखील आवडत होती. त्यामुळे त्याने परीक्षेसाठी प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र मुंबई येथे सलग सहा महिने कसून तयारी केली होती. त्यानंतर त्याने थेट दिल्ली गाठली.
नुकताच यूपीएससीचा निकाल जाहीर झाला असून, शिशिरने संपूर्ण भारतातून ९० वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे त्याची केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली आहे. असिस्टंट कमांडंट हे पद उपविभागीय पोलिस अधिकारी दर्जाचे आहे. या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) लेखी परीक्षेत देशभरातून ९० वा क्रमांक पटकावला आहे. त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.