⁠  ⁠

लेकीच्या उज्वल भविष्यासाठी रेल्वे स्टेशनवरचा हमाल बनला आयएएस अधिकारी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

आयुष्यात यश आला शॉर्टकट नाही. त्यासाठी मेहनत सातत्य आणि जिद्द असणे आवश्यक असते. आपली परिस्थिती ही कधीच आपले यश ठरवू शकत नाही त्यासाठी आपण किती मेहनत केली हे आपले यश ठरवते. अशाच असंख्य अडचणींचा सामना करून व त्यातून मार्ग काढून यशाला गवसणी घातली आहे श्रीनाथ यांनी.

श्रीनाथ हे रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करायचे. ते मूळचे केरळ येथील मुन्नारचे रहिवाशी आहेत. ते विवाहित असून त्यांना एक बाळही आहे. केरळ मधील एरणाकुलम रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करायचे. रोजचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसा हा महत्त्वाचा असतो परंतु हमाल कामातून त्यांना पाहिजे तेवढा पैसा मिळत नव्हता, आणि कुटुंबीयांची व मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी देखील त्यांच्यावर होती.

याच परिस्थितीमुळे श्रीनाथ यांनी मुलीचे आयुष्य सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी यूपीएससी परीक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. यूपीएससी ही परीक्षा सगळ्यात अवघड परीक्षांपैकी एक मानले जाते. परंतु मुलीच्या उज्वल भविष्यासाठी हा निर्णय घेणे त्यांना महत्त्वाचे वाटले व त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले परंतु ते त्यावरून मार्ग काढत त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.

श्रीनाथ हे हमाल काम करायचे त्या कामासाठी मिळणारा मोबदला पुरेनासा होता म्हणून त्यांचे उत्पन्न देखील कमी होते यूपीएससी सारख्या परीक्षेचे कोचिंग क्लासेस ची फी त्यांना झेपणारी नव्हती. त्यासाठी त्यांनी स्वतः अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यासाठी लागणारे साहित्य पुस्तिका खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे ते रेल्वे स्टेशनवरच फ्री वायफाय चा वापर करून यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायचे.

त्यांनी आधी केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी तयारी सुरू केली, यामध्ये यश आल्यानंतर त्यांचे मनोबल वाढले व त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी तयारी सुरू केली. परंतु ही वाटेल तेवढी सोपी परीक्षा नाही यामध्ये त्यांना एक नव्हे दोन नव्हे सलग तीन वेळा अपयश आले परंतु तरीही खचून न जाता त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले व अखेर त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली,व आज ते आयएएस ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.

Share This Article