⁠
Inspirational

क्रिकेटरची आयपीएस पदी बाजी ; जिद्दीने जिंकले युपीएससीचे मैदान….

UPSC Success Story आपल्याला अनेकदा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कमी खेळण्याचा सल्ला दिला जातो. पण खेळामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य तर राहते पण एकाग्रता पण वाढते. अभ्यासात देखील याचा खूप उपयोग होतो. कार्तिक मधीराने हे दाखवून दिले आहे. तो क्रिकेटपटू तर बनला महाराष्ट्र केडरमधील आयपीएस अधिकारी बनला. चला जाणून घेऊया कार्तिक मधिराच्या क्रिकेटच्या मैदानापासून प्रतिष्ठित भारतीय पोलीस सेवा (IPS) पर्यंतच्या प्रवासाची ही यशाची कहाणी…

कार्तिक मधिरा हा मूळचा हैदराबादचा असून, त्याने आपल्या खेळाच्या कारकिर्दीत अंडर-१३, अंडर-१५, अंडर-१७ आणि अंडर-१९ स्तरांवर तसेच विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळला आणि यात विशेष कामगिरी केली.भारतीय पोलीस सेवेत येण्यापूर्वी, कार्तिक मधीराने जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (JNTU) मधून संगणक विज्ञान अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. कार्तिकच्या क्रिकेटपटूपासून आयपीएसची इच्छा बाळगण्यामागे वैयक्तिक कारणे आणि शारीरिक दुखापत होत्या. त्यामुळे तो या स्पर्धा परीक्षेकडे वळला.

कार्तिक मधिराचे युपीएससीच्या परीक्षेतील यश सर्वांगीण तयारीच्या दृष्टिकोनाचे महत्त्वाचे आहे. त्यांनी या तयारीच्या दरम्यान प्रिलिम्स आणि मेनसाठी अनेक चाचणी मालिका सोडवल्या. तसेच, लेखन कौशल्याचा सराव केला. याशिवाय, त्याने आपले व्यक्तिमत्व वाढविण्याचे काम केले. तरीही तोपहिल्या तीन प्रयत्नांमध्ये तो अपयशी ठरला. तरीही त्याने अभ्यास चालू ठेवला. विशेषत: त्याच्या वैकल्पिक विषयावर, समाजशास्त्र या विषयावर लक्ष केंद्रित केले. त्याने युपीएससीच्या वेगवेगळ्या फेऱ्यांची स्वतंत्रपणे तयारी करण्याऐवजी, कार्तिकने प्रिलिम आणि मुख्य दोन्हीसाठी एकाच वेळी सर्वसमावेशक तयारी करून त्या दृष्टिकोनातून अभ्यास केला. त्यामुळेच तो युपीएससीच्या २०१९च्या परीक्षेत चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाला. सध्या ते आयपीएस अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत.

Related Articles

Back to top button