वडील चहा विक्रेते, आईचा विड्याचा व्यवसाय ; पोराने केले आई – वडिलांच्या कष्टाचे चीज अन् झाला IAS अधिकारी!
IAS Success Story माणसाची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी हुशारी आणि अभ्यास, कष्टाने परिस्थिती नक्कीच बदलता येते. ही परिस्थीती कशीही असली तरी मुलांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम आई-वडील करत असतात. खिलारी कुटूंबियांनी गरीबीचे दिवस काढत मुलाला उच्च शिक्षण दिले. पण मंगेशने आज त्याने आई – वडिलांच्या कष्टाचं चिज केले.
मंगेशने सुरुवातीपासूनच UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्याचा ध्यास घेतला होता.दोन स्वप्न पाहिली होती. एक तर त्याला आयआयटी मध्ये जायचे होते. तर दुसरे युपीएसीची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे होते. आर्थिक अडचणीमुळे आयआयटीला जाता आले नाही. त्यामुळे त्याने मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने यूपीएससीचा मार्ग निवडला. यामध्ये मित्रांचे आणि शिक्षकांचे मोठे सहकार्य लाभले. आई-वडिलांना आर्थिक भार उचलला त्यामुळे त्यास हे यश मिळवू शकले.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर सारख्या ग्रामीण भागात चहा विक्री करून आपले कुटूंब चालवणाऱ्या पाराजी खिलारी यांचा मुलगा मंगेश खिलारी.संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील पाराजी खिलारी गावात छोटसं चहा नाष्ट्याचं दुकान चालवतात. तर मंगेशची आई विड्या बनवून कुटूंबाला हातभार लावते. घरची परिस्थिती बेताची असतानाही मंगेशने युपीएससी परीक्षेचा जिद्दीने अभ्यास करत देशात ३९६ वा नंबर मिळवत उत्तीर्ण झाला.मंगशचे प्राथमिक शिक्षण गावातच झेडपीच्या शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण संगमनेर शहरात घेतले.राज्यशास्त्रात पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आला. तिथेच त्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.
या संपूर्ण प्रवासात त्याला अपयश देखील आले. तो दोनदा मुलाखतीच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाला. मागच्या प्रयत्नात फक्त तीन गुणांनी रँक गमावली. मग त्याने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. तो दररोज १५-१६ तास अभ्यास करायचा आणि सोशल मीडिया वापरणे बंद केले होते. घरच्यांचा पाठिंबा, बदलती परिस्थिती आणि कष्टाची साथ यामुळे त्याने तिसऱ्या प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. अखेर, तो आय.ए.एस अधिकारी झाला.