⁠  ⁠

छोट्या आदिवासी पाड्यातील लेकीची कमाल ! थेट UPSC परीक्षेत मारली बाजी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC Success Story : आपल्या आयुष्यात कितीही खडतर परिस्थिती आली, तरी न डगमगता त्याला तोंड देत नशिबाला झुकवून हवं ते मिळवतात. हेच मनीषा धारवे या लेकीने करून दाखवले आहे. खरगोनच्या झिरनिया ब्लॉकमधील बोंडारण्य गावातील रहिवासी.तिचे वडील गंगाराम धारवे हे अभियंता होते, पण त्यांनी मोठ्या शहरात जाऊन नोकरी केली नाही, तर खेड्यातील मुलांना शिक्षण देण्याची त्यांची इच्छा होती आणि यामुळे ते आपल्या गावी परत आले आणि सरकारी शाळेत शिकवू लागले, ज्यामध्ये त्यांची पत्नी जमना धारवे यांनी त्यांना साथ दिली.

मनीषाला लहानपणापासून अधिकारी होण्याची इच्छा होती. तिचे शालेय शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतून झाले. तर आठवीपर्यंत सरकारी शाळेतून शिक्षण घेतले आणि खरगोन येथील शाळेतून दहावी आणि बारावी उत्तीर्ण केली. तिने बारावीत गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय घेतले होते‌.दहावीत ७५ टक्के आणि बारावीत ७८ टक्के गुण मिळवले.मनीषाने इंदूरच्या होळकर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स केले आणि त्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

तीन प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. पण मनीषाने सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि तिचे प्रयत्न चालू ठेवले आणि शेवटी तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि तिने २०२३ युपीएससीमध्ये उत्तीर्ण केले.मनीषाने ना हार मानली ना खचली, तिचा तिच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच ती आज अधिकारी आहे.

Share This Article