---Advertisement---

छोट्या गाडीवर अंडी विकणारा होतकरू तरूण झाला आयएएस मनोज कुमार…

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : खरंतर आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती सारखीच राहत नाही. त्यात विविध अडचणी व सु:ख – दु:खाचे क्षण येत राहतात. या अडचणींवर मात करत शिक्षण घेत….यशाचा मार्ग काढायला हवा.‌ याचे उत्तम उदाहरण आयएएस मनोज कुमार राय. घरची परिस्थिती बेताची…आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी अनेक प्रयत्न केले.आयएएस मनोज कुमार राय यांचा जन्म बिहारमधील सुपौल दुर्गम खेडेगावात झाला.

ग्रामीण जीवनातील साधेपणातून, दिल्लीच्या गजबजलेल्या महानगरापर्यंत स्वतःला घेऊन आले. त्यांनी शहरात आल्यावर उपजीविकेच्या शोधात विविध व्यवसायांमध्ये प्रवेश केला. त्यांनी गाडीवर अंडी विकण्यापासून ते रखवालदार, फरशी पुसण्यापर्यंतची अनेक कामे केली. अशी सर्व कामे करत असताना शिक्षण मागे ठेवले नाही. त्यांनी शिक्षण देखील पूर्ण केले.श्री अरबिंदो कॉलेजमध्ये त्यांनी पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला.पुढे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या कॉरिडॉरमध्ये प्रवेश घेऊन, त्यांनी स्वतःच्या शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला.

काम व अभ्यास यामध्ये समतोल साधत, मनोज यांनी स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. आपण अभ्यास केला तर चांगला अधिकारी होऊ शकतो. हे त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.अयशस्वी प्रयत्नांपासून ते भाषिक अडथळ्यांपर्यंत त्यांच्यासमोर अनेक संकट आली. तरीही प्रत्येक धक्क्याने खचण्याऐवजी ते नेहमीपेक्षा अधिक दृढनिश्चयी होत गेले.मनोज राय यांचे आयएएस अधिकारी होण्यापूर्वीचे अनेक संकटांचे होते. स्वप्नपूर्तीसाठी स्वतःला यूपीएससी (UPSC) परीक्षेच्या तयारीमध्ये झोकून दिले. या अखेर मनोज यांच्या चिकाटी अन् कष्टाला यशाचे फळ लाभले आणि ते आयएएस अधिकारी झाले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts