⁠  ⁠

छत्तीसगड मधील दुर्गम भागात राहणाऱ्या नम्रताची संघर्षमय यशोगाथा !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC Success Story युपीएससीची परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.यात काहींना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते तर काहींना अपयश येते.‌ हा संपूर्ण प्रवास हा संयम आणि चिकाटीचा असतो. असाच नम्रता जैन (Namrata Jain) हिचा प्रवास देखील संघर्षमय होता. आधी शिक्षणासाठी धडपड करावी लागली आणि नंतर स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागला.

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात वाढलेली नम्रता जैन. शालेय जीवनात आणि कॉलेजमध्येही खूप अभ्यासू होती. ती दहावीसाठीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दुर्गला गेली होती. येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भिलाईला गेली. येथून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. तिने या परीक्षेसाठी रात्रंदिवस मेहनत केल्यानंतर २०१५ साली पहिलाच प्रयत्न केला.

मात्र ती अपयशी ठरली. तिला प्रिलिमही क्लिअर करता आली नाही. तिने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. तिने कधीही तिच्या अभ्यासात रस गमावला नाही आणि लक्ष केंद्रित केले. पहिल्याच प्रयत्नात पहिल्या टप्प्यातून बाहेर पडलेल्या नम्रताने हार मानली नाही. ती तयारीत व्यस्त राहिली. यानंतर ती २०१६ मध्ये पुन्हा एकदा परीक्षेला बसली. या प्रयत्नात तिने ९९ वा क्रमांक मिळविला. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती मध्य प्रदेश केडरच्या आयपीएस अधिकारी झाली. मात्र, तिचे आयएएस होण्याचे त्यांचे स्वप्न होते.

त्यामुळे, तिने हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षणासोबतच यूपीएससीच्या तयारीतही व्यस्त झाली. यानंतर आपल्या उणिवांवर काम करत त्याने २०१८मध्ये तिसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि यावेळी तिचे स्वप्न पूर्ण झाले. अखेर, ती १२वा क्रमांक पटकावून आय.ए.एस अधिकारी झाली.

Share This Article