---Advertisement---

भावाचे मार्गदर्शन आणि घरच्यांचा पाठिंबा; डॉ. नेहा झाली प्रशासकीय अधिकारी !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : खरंतर आयुष्याच्या वळणावर अनेक करिअरच्या वाटा बदलत असतात. त्यातून नवनवीन शिकवण मिळत जाते.‌ तसेच, देश पातळीवरील क्रमवारीत डॉ. नेहा यांनी ५१वे स्थान पटकाविले आहे. डॉ. नेहा राजपूत यांचे वडील उद्धवसिंग राजपूत यांचे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील सागवन असे आहे. मात्र, नोकरीच्या निमित्ताने ते जळगावला स्थायिक झाले. तिथेच तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.

नेहा यांनी जळगाव शहरातील सेंट लॉरेन्स हायस्कूल जळगाव याठिकाणी नर्सरी ते दहावीचे शिक्षण पूर्ण केले. तर जळगाव येथील एम. जे. कॉलेज येथून अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेत पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील केईम रुग्णालय याठिकाणी एमबीबीएससाठी प्रवेश घेतला. केईएम रुग्णालयात इंटर्नशिप करत असताना त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. एमबीबीएस करत असतानाच दरम्यान त्यांचा भाऊ युपीएससीची तयारी करत होता. त्यासाठी त्याने स्वतःसाठी काही पुस्तके घेतली होते.

मात्र, त्याच्या खाजगी नोकरीमुळे तो नीट तयारी करू शकला नाही आणि शेवटी त्याने परीक्षा दिली नाही, त्यावेळी तेव्हा त्याने मला सांगितले की तू ही परीक्षा देण्याचा विचार कर. हेसुद्धा एक करिअरचं चांगलं ऑप्शन आहे. तू करू शकतेस हा विश्वास दाखवला. त्यानंतर, त्यांनी अभ्यासला सुरूवात केली.एमबीबीएस करत असताना तिसऱ्या वर्षापर्यंत तर मला सर्जनच बनायचं असं स्वप्न होतं. त्यासाठी मी क्लासेसही सुरू केले होते. पण, केईएम रुग्णालयात इंटर्नशिप करत असताना त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला.

तिने २०२२ पासून पूर्व वेळ यूपीएससी परिक्षेच्या तयारीला सुरुवात केली. त्यानंतर मे २०२४ मध्ये पूर्व परीक्षा दिली. त्यामध्ये ती उत्तीर्ण झाली. मी मुख्य परीक्षेसाठी दिल्लीला गेली. तिथे जाऊन तिला खूप फायदा झाला. तसेच तिने मुलाखतीचीही तयारी केली. मुलाखतीसाठी अनेकांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाली. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश आले. देश पातळीवरील क्रमवारीत डॉ. नेहा यांनी ५१वे स्थान पटकाविले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts