---Advertisement---

माळेगावच्या लेकाची अभिमानास्पद झेप ; निरंजनने UPSC परीक्षेत बाजी मारली

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परिक्षा, मुलाखती देत असतात. परंतू त्यापैकी मजक्याच मुलांना यश मिळते. तर काहींना काहीशा गुणांनी अपयश‌ येते. पण या संपूर्ण प्रवासात आपण जिद्दीने प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.असेच बारामती तालुक्यातील‌ माळेगाव बुद्रूक येथील निरंजन महेंद्रसिंह जाधवराव या युवकाने २८७ रॅंक मिळवून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला.

या प्रक्रियेत अभ्यासात सातत्य, जबरदस्त इच्छाशक्ती आणि कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो…तो निरंजनला कायम मिळत राहिला. त्याच्या घरचे शैक्षणिक वातावरण असल्याने त्याला हा महत्त्वाचा आधार होता. निरंजन याचे बीई मॅकॅनिकल शिक्षण झाले असून सन २०१९ पासून स्पर्धा परिक्षा देत होता. याचाच अर्थ पहिल्या, दुसऱ्या प्रयत्नात अपयश आले म्हणून तो डगमगला नाही. भिती, निराशा आणि पच्छाताप या गोष्टीवर मात करणे तसे कठीण होते, परंतु इच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा पुन्हा प्रयत्न केला आणि निरंजने २८७ रॅंक मिळविली.

---Advertisement---

त्याने अभ्यासाचे नियोजन तर केलेच पण अनेक नमुना प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव केला. परिक्षेचा विषय आणि त्या परिक्षेसाठी वापरायला लागणारी भाषा या दोन्ही गोष्टींचे पूर्ण आकलन केले.सोमेश्वरनगरमधील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक महेंद्रसिंह जाधवराव यांचा निरंजन हा मुलगा आहे. कठोर परिश्रम आणि मेहनत, कुटुंबाचा आधार या जोरावर निरंजनने केंद्रीय लोकसेवा आयोगाने सन २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकालात बाजी मारली आहे‌.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts