UPSC Success Story : वडील रंगकाम कामगार, आई शिवणकाम करून संसार चालवत तिन्ही मुलांचे पालन पोषण केले. पण मुलीने जिद्दीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीच्या परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. पल्लवी देवीदास चिंचखेडे असे या तरूणीचे नाव आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिला ६३ वे स्थान मिळाले आहे. तिचा यूपीएससीचा हा खडतर प्रवास नक्की वाचा
पल्लवीचे शालेय शिक्षण हे आनंद प्राथमिक शाळेत झाले. अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक पूर्ण केल्यानंतर तीन वर्षातच खासगी नोकरी सोडली आणि यादरम्यान मिळविलेल्या पैशातून दिल्ली गाठून यूपीएससीची तयारी सुरू केली.
एखादी गोष्ट साध्य करायचा निर्धार केला की अडचणी आपोआप दूर सारल्या जातात. त्यामुळे, आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी यावर मात करत यश मिळवले.या संपूर्ण प्रवासात आधीच्या मिळविलेल्या पैशातून दिल्ली गाठून यूपीएससीची तयारी सुरू केली. तिला चौथ्या प्रयत्नात यश मिळाले.
तिला युपीएससीच्या २०२१ च्या या परीक्षेत यश मिळाले. त्यात तिला ६३ वे स्थान मिळाले आहे.तिच्या या प्रवासात तिला आई-वडिलांनी बळ आणि आपल्या परीने मार्गदर्शन केले.आपल्या स्वप्नांपुढे परिस्थितीही झुकते ,हे तिने सिद्ध केले आहे