लहानपणापासून हुशार असलेल्या परीची यशोगाथा !
UPSC Success Story आपला प्रत्येक प्रवास हा नव्या वाटेवर काही ना काही शिकवतो. तसेच परी बिश्नोईचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. त्यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता आय.ए.एस अधिकारी म्हणून देशाची सेवा करत आहे.
राजस्थानमधील बिकानेर येथील असलेल्या परीने तिचे शालेय शिक्षण झाले. अजमेर येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. ती शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थिनी होती. तिला दहावीमध्ये ९१% तर बारावीत ८९% मिळाले. आई जीआरपीमध्ये पोलीस अधिकारी म्हणून काम करते, तर तिचे वडील वकील आहेत. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर ती दिल्लीला गेली, जिथे तिने दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमनमध्ये अंडरग्रेजुएट पदवीसाठी शिक्षण घेतले.
त्यानंतर, तिने अजमेरमध्ये आपला अभ्यास सुरू ठेवला, जिथे तिने एमडीएस विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. हे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, परीने आयएएस अधिकारी होण्यासाठी यूपीएससी प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सर्व त्याग आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळाले. कारण तिने तिसऱ्या प्रयत्नात २०१९ मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिसावा रॅंक मिळाला.