UPSC Success Story : कोणत्याही यशाचा खडतर मार्ग हा कष्ट असतो. कष्टाला कधीच पर्याय नाही. प्रियमवदा अशोक म्हाडदळकर, आयआयएम बंगलोरची माजी विद्यार्थिनी…बी.टेक आणि नंतर एमबीए केल्यानंतर बँकिंग क्षेत्रात पाऊल टाकले पण तिचे काही मन रमले नाही. म्हणून, प्रियमवदाने तिची कॉर्पोरेट नोकरी सोडून आयएएस अधिकारी होण्याचे तिचे ध्येय पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
तिचे वडील शासकीय सेवेत असल्याने लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेचे क्षेत्र खुणावत होते. आईलाही ती प्रशासकीय सेवेत जावे, असे वाटत होते. त्यामुळे एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करत असले, तरी हे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. २०१८ मध्ये लग्न झाल्यानंतर हैद्राबादला स्थायिक झाले होते. २०२० मध्ये नोकरी सोडण्याचा विचार केला, तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी पाठिंबा दिला.
कोरोनाचा काळ असल्याने ऑनलाइन पद्धतीनेच सगळे सुरू होते. त्यामुळे बहुतांश विषयांचे स्वयंअध्ययन करण्यावर भर दिला. मात्र, समाजशास्त्र आणि एथिक्सच्या पेपरसाठी ऑनलाइन मार्गदर्शन घेतले.ती रोज किमान नऊ तास अभ्यासाठी द्यायची. मुख्य परिक्षेतून निवड झाल्यानंतर मुलाखतीची विशेष तयारी केली. चालू घडामोंडीचा तपशीलात अभ्यास केला. कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याऐवजी तिने स्वयं-अभ्यास आणि ऑनलाइन शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.संपूर्ण इच्छाशक्तीच्या जोरावर तिने तयारीच्या प्रवासात सर्व अडथळे पार केले. तिच्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांसह तिची कठोर तयारी करण्यातही तिला झगडावे लागले.प्रियमवदाच्या पालकांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला.
नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या निकालात मुंबईच्या प्रियंवदा यांनी देशात तेरावा क्रमांक पटकावला असून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.