कष्टाने मिळवले की यश देखील मिळतेच; चौथ्या प्रयत्नात झाली युपीएससी परीक्षा उत्तीर्ण !
UPSC Success Story : प्रियांकाला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. तिने ठरवले होते की आपण मोठेपणी अधिकारी व्हायचे.हा प्रवास इतका सोपा नव्हता. प्रियांकाला पहिल्याच प्रयत्नात अपयश आले. प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. तर दुसऱ्या प्रयत्नात ती फक्त ०.७ गुणांनी हुकली. चार प्रयत्न केल्यानंतर ही ती प्रिलिम्सची परीक्षा पास करू शकली नाही.
दिल्लीची राहणारी प्रियांका गोयलने दिल्ली विद्यापीठाच्या केशव महाविद्यालयातून बीकॉम केले आहे. पदवी परीक्षा झाल्यानंतर तिने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पदवीनंतर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. प्रवासातून तुम्हाला देखील एक प्रेरणा मिळू शकते. प्रियांका हिने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये यश मिळविले.
या प्रवासाता तिने मागे वळून पाहिलेच नाही. अभ्यास आणि ध्यास चालूच ठेवला. तिने लोकप्रशासन या वैकल्पिक विषयात तिला २९२ गुण मिळाले आणि मुलाखतीत १९३ गुणांसह एकूण ९६५ गुण तिने मिळवले.