UPSC Success Story : रोजच्या जीवनातील हजारो अडचणी समोर येत असतात. पण स्वप्न बघणं आणि ते पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र धडपडणे महत्त्वाचे आहे. तसेच, राहुलला सुरुवातीपासूनच नागरी सेवेबाबत आकर्षण होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याने राज्यस्तरीय परीक्षांवर लक्ष केंद्रित केलं. तसेच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करत राहिला आणि यामध्ये घवघवीत यश मिळवलं.
राहुल सांगवान या तरुणाने कमाल केली आहे. राहुलची आई अंगणवाडी सेविका आहे आणि वडील शिक्षक आहेत. राहुलने सेल्फ स्टडी केला आणि दररोज ७ ते ८तास अभ्यास करून त्याने देशातील सर्वांत महत्त्वाच्या अशा युपीएससी परीक्षेत ५०८व्या क्रमांकाने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
राहुल सांगवान हा मूळचा हरियाणातील भिवानी येथील मिताथल गावचा रहिवासी आहे. त्याने आपले शालेय शिक्षण भिवानी येथून पूर्ण केले आणि नंतर सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने चौधरी बन्सीलाल विद्यापीठातून एम.ए पूर्ण केले. राहुलचे वडील व्यवसायाने शिक्षक आहेत तर आई अंगणवाडी सेविका आहे.ध्येय गाठण्यासाठी काही लोक खूप मेहनत करतात आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करतात.यापैकी एक राहुल हे उत्तम उदाहरण आहे.