अंगणवाडी सेविकेचा मुलगा सेल्फ स्टडी करून बनला प्रशासकीय अधिकारी!

Published On: ऑक्टोबर 29, 2023
Follow Us

UPSC Success Story स्पर्धा परीक्षा म्हटलं की महागडे क्लासेस आणि ॲकेडमी लेक्चर या गोष्टींची गरज असते, त्यामुळे परीक्षेत यश मिळते. असा गैरसमज आहे. खरंतर स्वतः अभ्यास करून सेल्फ स्टडीच्या जोरावर देखील यश मिळवता येतं, हे राहुल सांगवान या तरूणाने करून दाखवले आहे. त्याने दररोज सेल्फ स्टडी करून, सात ते आठ तास अभ्यास करून देशातील सर्वात प्रतिष्ठित सेवेत ५०८व्या क्रमांकाने ही युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

राहुल सांगवान हा मूळचा हरियाणातील भिवानी येथील मिताथल गावचा रहिवासी आहे. त्याने आपले शालेय शिक्षण भिवानी येथून पूर्ण केले.त्याच्या शालेय शिक्षणादरम्यान, राहुल नेहमीच गुणवत्ता यादीतील विद्यार्थी राहिला आहे. राहुलने त्याच्या वडिलांच्या शाळेतच शिक्षण घेतले. तो नेहमीच हुशार होता. त्याने 8वीच्या परीक्षेत ९६% आणि दहावीच्या परीक्षेत ९८% गुण मिळाले.बारावीच्या परीक्षेतही ९७% गुण मिळवून त्याने गुणवत्तात यादीतील नाव कायम ठेवले.त्याने श्री राम वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, बाँड येथून बारावीचे शिक्षण घेतले. नंतर सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने चौधरी बन्सीलाल विद्यापीठातून एम.ए पूर्ण केले.

राहुल सांगवानची आई उर्मिला अंगणवाडी सेविका आहेत, तर वडील नीर गावातच दहावीपर्यंत शाळा चालवून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. आपले ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थी खूप मेहनत करतात आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करतात. अशीच ही प्रेरणादायी गोष्ट आहे. त्याला लहानपणापासूनच लोकांची सेवा करण्यासाठी युपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे होते.या क्षेत्राचे त्याला विशेष आकर्षण होते. त्यामुळे, तो घरच्या घरी दररोज नित्यनेमाने वाचन आणि लेखन करायचा.‌ सुरुवातीला त्याने राज्यस्तरीय परीक्षांवर लक्ष केंद्रित केलं.

तसेच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करत राहिला. कधी त्या अपयश आले तरी पुन्हा कुठे चूक होऊ नये म्हणून शोधत नव्याने अभ्यासासोबत एकनिष्ठ होऊन तयारी करायचा. अखेर, त्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्याने ५०८व्या क्रमांकाने ही युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तो आय.ए.एस अधिकारी झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025