---Advertisement---

कोकणातल्या लेकाची कमाल ; UPSC परीक्षेत गगनभरारी!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : कोणतेही परीक्षा असली तरी जिद्द ही कायम असायला हवी. अशाच जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात समर्थ शिंदे याने हे मोठं यश मिळवलं आहे. २५५व्या रँकने राष्ट्रीय पातळीवर त्याने कोकणचा झेंडा फडकवला आहे.

समर्थ शिंदे हा मूळचा चिपळूण शिर्डी सती येथील आहे.त्याचे शालेय शिक्षण हे खेर्डी येथील मेरी माता स्कूलचा प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आहे. पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण त्याने खेर्डी येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याने रत्नागिरी येथील फिनोलेक्स कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअर पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.समर्थ शिंदे याचे वडील अविनाश शिंदे यांची गॅस एजन्सी असून त्याची आई शिक्षिका आहे. तर एक लहान बहीण पुण्यामध्ये शिक्षण घेत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली.

यूपीएससी अभ्यासाच्या तयारीसाठी त्याला पुणे येथील चाणक्य मंडळाचे डॉ. अविनाश धर्माधिकारी यांचं मोठं मार्गदर्शन मिळालं. तो दररोज पाच ते सहा तास या परीक्षेचा अभ्यास करायचा. त्याने २०२२ पासून यूपीएससी परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला होता. २०२३ जून मध्ये त्याने यूपीएससीची पहिली परीक्षा दिली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये लेखी परीक्षा झाली. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर ११ मार्च २०२४ ला त्याची दिल्ली येथे मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीनंतर समर्थ गुणवत्ता यादीत राष्ट्रीय पातळीवर चमकला आहे.

१६ एप्रिल २०२४ रोजी मंगळवारी यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गुणवत्ता यादीत कोकणातला समर्थने मोठी भरारी घेतली आहे. ही कोकणकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts