⁠  ⁠

वडील शेतकरी, घरची परिस्थिती बेताची पण मुलगा झाला प्रशासकीय अधिकारी!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC Success Stori आयुष्यात काहीतरी कमवायचे असेल तर काहीतरी गमवावे लागते. तसंच शिवम व्दिवेदी यांने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळला. असंख्य अर्जदारांपैकी केवळ मोजकेच उमेदवार परीक्षेचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार करण्यात यशस्वी झाले. निवडलेल्या बॅचमधील एक उल्लेखनीय व्यक्ती म्हणजे शिवम द्विवेदी.

उत्तर प्रदेशातील भंडा जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सामान्य अशा महता गावातील,शिवम द्विवेदी. गावातील शाळेतूनच शालेय शिक्षण पूर्ण केले. आर्थिक अडचणींचा सामना करूनही त्यांनी अभ्यासाशी कधीही गट्टी तोडली नाही. बारावीपर्यंत सर्व परीक्षेत अव्वल असायचा. बारावीनंतर सुरुवातीला आयआयटी जेईई परीक्षेत उत्तीर्ण होऊन, शिवम द्विवेदीने उत्कृष्ठ गुणांच्या जोरावर प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मध्ये स्थान मिळाले. पदवी प्राप्त केल्यानंतर, स्पर्धा परीक्षेचा जोमाने अभ्यास केला.

सुरुवातीच्या त्याला नोकरीही करावी लागली पण त्याने स्वतःला संपूर्ण अभ्यासासाठी समर्पित केले. तो दिवसातील आठ तास तरी अभ्यास करायचा.‌ शिवम द्विवेदी यांनी त्यांच्या यशात महत्त्वपूर्ण घटक होता ते वेळचे नियोजित व्यवस्थापन. वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष देऊन त्याने नियोजनबद्ध तयार केली. अखेर त्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. जिद्द आणि कठोर परिश्रमातून द्विवेदींनी हे सिद्ध केले आहे की कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही हिंमतीने यश मिळवता येते. त्यास प्रशासकीय अधिकारी झाला आहे. त्याला ऑल इंडिया रँक (AIR) २० वा क्रमांक मिळाला आहे.

Share This Article