शेतकऱ्यांच्या मुलीची कमाल ; पहिल्याच प्रयत्नात मिळवले युपीएससीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश !
UPSC Success Story जेव्हा बीड सारख्या दुष्काळग्रस्त भागातील मुले यशस्वी होतात तेव्हा नवी ऊर्जा मिळते. तसा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे. मात्र आता येथील मुलांनी शिक्षण, खेळ या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून जिल्ह्याचे नाव एका वेगळ्या उंचीवर पोहचविले आहे. श्रद्धा शिंदे असे या शेतकरी कन्येचे नाव आहे. तिने पहिल्या प्रयत्नात यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे.
श्रद्धांचे शालेय शिक्षण देखील लोणी येथे झाले आहे. माध्यमिक शिक्षण बीड येथे तर अभियांत्रिकी शिक्षण हे औरंगाबाद येथे झाले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने युपीएससीच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. काही या संदर्भात यूपीएससीचे क्लासेस केले आणि त्या नंतर तिने स्वतः अभ्यासाचे नियोजन केले.
जानेवारी २०२० मध्ये यूपीएसीमध्ये पहिल्या प्रयत्नांमध्ये हे यश मिळवले.अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने मिळवलेले हे यश प्रेरणादायी आहे. त्यात आई- वडिलांनी देखील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे तिने हे यश गाठले आहे.