पुण्यातल्याभाजी विक्रेत्याच्या मुलाचे यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश!
UPSC Success Story लहानपणापासून संघर्ष वाटायला आला होता. सिध्दार्थचे वडील पुण्यात भाजी विकतात तर आई त्यांना मदत करते. सिद्धार्थ देखील पूर्वी रिक्षा चालवायचा. येरवडा ते वाघोली मार्गावर या मार्गावर रिक्षा चालवून घरच्यांना मदत करायचा.
तो देखील करोना काळात वडिलांना भाजी विक्री करायला मदत करायचा. घरचे इतके आपल्यासाठी मेहनत घेत आहेत. एवढा संघर्ष करत आहेत, आपण भविष्यासाठी काही तरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे, या उद्देशाने त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली.
सिद्धार्थ हा मूळ पुण्यातील खराडी भागातील रहिवासी. त्याला अकरावी – बारावी पासून भविष्यात आपण यूपीएससी परीक्षा द्यावी, असे वाटत होते. हा पाया पक्का होण्यासाठी त्याने राज्यशास्त्र विषयातून पुण्यातील वाडिया कॉलेजमधून पदवी घेतली. मुख्यत्वे, करोना काळात अभ्यासाची तयारी सुरु केली आणि दुसऱ्या प्रयत्नात यश ह्या परीक्षेत यश मिळाले.
यामागे जवळपास साडेतीन वर्षांची मेहनत आहे.आता ट्रेनिंग काळ सुरू असला तरी, “मला जे पद भेटेल त्यावर काम करताना पूर्ण क्षमतेनं ते पूर्ण करणार आहे. माझ्याकडे जी जबाबदारी येईल ती वेळेत पार पाडण्याचा प्रयत्न असेल”, असे सिद्धार्थ भांगे याचे म्हणणे आहे..