UPSC Success Story आपण लहानपणापासून बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नशील असलो की नेहमीच यश मिळते.स्तुती चरण या अत्यंत हुशार आयएएस अधिकारी. यांना नेहमीच समाजाच्या भल्यासाठी काम करायचे होते. तिच्या पदवीच्या दरम्यान यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती आणि नेहमीच आयएएस अधिकारी होण्यावर लक्ष केंद्रित केले होते.
स्तुती चरणचे हे स्वप्न २०१२ मध्ये साकार झाले. जेव्हा तिने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिसरा क्रमांक मिळवला, हा तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण होता.विशेष म्हणजे स्तुती चरण यांनी आयएएस अधिकारी होण्यापूर्वी युको बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून काम केले होते.
स्तुती चरण राजस्थानमधील जोधपूरमधील खारी कल्ला नावाच्या गावातील आहे. तिचे वडील राम करण बरेथ राजस्थान स्टेट वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत, तर तिची आई सुमन हिंदी व्याख्याता आहे. स्तुतीची धाकटी बहीण नीती डेंटिस्ट आहे.
स्तुती चरणचे शालेय शिक्षण विवेकानंद केंद्र विद्यालय (हुरडा), भिलवाडा येथून पूर्ण केले. तिने लाचू मेमोरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधून पदवी प्राप्त केली आहे आणि नंतर आयआयपीएम, नवी दिल्ली येथून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन पर्सोनेल आणि मार्केटिंग मॅनेजमेंट पूर्ण करण्यासाठी गेली आहे. पदवी प्राप्त झाल्यानंतर तिने युपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. रोजचे वाचन आणि घटकानुसार उजळणी हा नित्यक्रम होता. ती नेहमी अधिकारी झालेल्यांच्या मुलाखती बघत असे यातून आय.ए.एस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असे. याच दरम्यान त्यांना बॅंकेत नोकरी लागली. नोकरी करत देखील ध्यास पूर्ण करण्यासाठी त्या मेहनत घेत राहिल्या.याच प्रयत्नातून स्तुती चरणने युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे.