---Advertisement---

अखेर मेहनतीला आले यश!! सुरभी बनली IAS अधिकारी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : ग्रामीण भागातील मुलांचे बरेच न्यूनगंड दिसून येतो. आपण शहरात कसे राहू? इंग्रजी भाषा बोलता येत नाही, मग कसे बोलायचे? यामुळे कित्येकजण स्वप्न पाहत नाही किंवा झेप घेण्यासाठी घाबरतात. पण कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील सुरभी गौतम आयएएस अधिकारी बनली आहे. सुरभीचा मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातून प्रवास सुरू झाला. ती मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील अमदरा गावातील रहिवासी आहे.

शालेय शिक्षण गावातील सरकारी शाळेतून झाले असून तिला दहावीमध्ये गणितात १०० पैकी १०० गुण होते. तिचे राज्याच्या मेरिट लिस्टमध्येही नाव आले. बारावीनंतर भोपाळमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला.

इंग्रजी भाषेमुळे अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लोकांनी थट्टा केली पण यामुळे ती खचली नाही.दररोज किमान १० इंग्रजी शब्दांचा अर्थ जाणून घेऊन इंजिनीअरिंग कॉलेजमधून उत्तीर्ण होताच सुरभीला टीसीएसमध्ये नोकरी मिळाली. पण तिचे स्वप्न आयएएस होण्याचे होते. पुढे, सुरभीने कंपनीतही नोकरी केली.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासारखा नोकरी सोडून त्याऐवजी इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व मिळवण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती अनेक स्पर्धा परीक्षा बसली. ज्यामध्ये ISRO, BARC, MPPSC, SAIL, FCI, SSC दिल्ली पोलीस इत्यादींचा समावेश आहे. सुरभीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसह यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. अखेर या अथक मेहनतीला फळ मिळाले आणि सुरभी युपीएससी स्पर्धा उत्तीर्ण झाली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts