⁠  ⁠

काबाडकष्ट करून भाजी विक्रेत्याची लेक झाली UPSC परीक्षा उत्तीर्ण!

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 2 Min Read
2 Min Read

UPSC Success Story आपल्याला शिक्षण घ्यायला हवंय ही जाणीव वेळीस झाली तर यशाची पायरी गाठता येते.मोहन आणि ललिता राठोड यांची मुलगी स्वाती युपीएससीची परीक्षा पास झाली आहे. त्यांच्या समाजात अजूनही शिक्षणाबाबत इतकीशी जागृतता नाही आहे. लहान वयात त्यांची लग्ने केली जातात. मुली आपल्यासाठी फक्त जबाबदारीचं ओझं असते, असं समजलं जातं.त्यांच्या समाजात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी आहे.

पण स्वातीने महत्त्वाचे पाऊल उचलले. ती उच्च शिक्षित झाली. नुसती शिकली नाहीतर स्वाती राठोडने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४९२वा रँक मिळवलाय.स्वातीच्या आईवडिलांनी काबाडकष्ट करून स्वातीला शिकवलं, कधी भाजी विकून, कधी मोलमजुरी करून स्वातीच्या शिक्षणाला त्यांनी मदत केली आणि त्यांच्या या कष्टाची जाणीव ठेवत स्वाती राठोडने पाचव्या प्रयत्नात युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे.

स्वाती ही सोलापूरच्या विजापूर रोड परिसरातील रहिवासी. तिचे वडील दहा वर्षांपासून हातगाडीवर भाजी विकतात. स्वातीच्या दोन बहिणी, आई वडील आणि एक धाकटा भाऊ असे कुटुंब आहे. हे संपूर्ण कुटुंब आधी मुंबईत राहायचे पण शहरात राहणे परवडत नसल्याने ते सोलापूरला राहण्यास आले.भाजीच्या कामात, घरातल्या कामात सर्व मुलंही वेळ पडल्यावर मदत करतात. तिचे शालेय शिक्षण हे कोपरखैरणे इथे असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेत झालं. तिथे आधी सातवीपर्यंतच शाळा होती.

पण योगायोग असा झाला की ती सातवी पास झाले आणि तिथे आठवी ते दहावीपर्यंतची शाळा सुरु झाली.त्यानंतर तिने सोलापूरच्या वालचंद कॉलेजमध्ये भूगोल विषयात बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी घेतली. मग स्पर्धा परीक्षा आणि अधिकारी व्हायचे स्वप्न उराशी बाळगून ती अभ्यासासाठी पुण्याला गेली. कुटूंबाने तिच्यासाठी मेहनत घेतली. तिला जसे जमेल तसे पैसे पाठवत गेलो. लेकीनेही आईबापाच्या कष्टाची जाण ठेवली.पाच प्रयत्नांनंतर ती अखेर विजयी झाली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्वातीच्या आईने आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी सोनेही गहाण ठेवले होते.आज सर्व कष्टाचे चीज झाले आणि स्वाती युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली.

Share This Article
Leave a comment