⁠  ⁠

आजी – आजोबांचे स्वप्न केले पूर्ण; विदुषी झाली IFS अधिकारी!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC Success Story जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अगदी लहान वयातच यश मिळवणे, ही काही सोपी गोष्ट नाही. अशीच एक प्रेरणादायी यशोगाथा आय.एफ.एस विदुषी सिंगची आहे. जिने वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.

विदुषीचा जन्म जोधपूर, राजस्थान येथे झाला. परंतू हे संपूर्ण कुटुंब अयोध्येशी जोडले गेले. तिने २०२१ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठित श्री. राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीए ऑनर्स (अर्थशास्त्र) पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तिने युपीएससीची तयारी सुरू केली. तिने कुठलेही कोचिंग न घेता कॉलेजमध्ये शिकण्याबरोबरच स्वत:चा अभ्यास केला.

त्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी विदुषीने पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण केले. तिने अर्थशास्त्र हा पर्यायी विषय म्हणून घेतला. तिने उत्कृष्ट रँक असूनही IAS ऐवजी IFS निवडले. भारतीय परराष्ट्र सेवेत सरकारी अधिकारी होण्याचे तिच्या आजी-आजोबांचे स्वप्न होते. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी तिने अनेक टेस्ट सीरिज आणि मॉक टेस्ट दिल्या होत्या. यामुळेच पहिल्या प्रयत्नात यश मिळाले.

Share This Article