⁠  ⁠

नोकरी सोडून UPSC परीक्षा देण्याचा घेतला निर्णय ; शेवटची यश मिळविले.. विशाखाचा प्रवास नक्की वाचा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read
Checking site.

UPSC Success Story आपल्या आवडीच्या वाटेवर जायचे असेल तर मार्ग हा निघतोच. हेच अनोळखी वाटेवर चालण्याचे धाडस आणि संकटांवर मात करत यशापर्यंत पोहचण्याचा विशाखाचा प्रवास नक्की वाचा….

दिल्लीच्या द्वारका येथील विशाखाचा जन्म. विशाखा (IAS Vishakha Yadav) लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिचे वडील राजकुमार यादव हे सहाय्यक उपनिरीक्षक आहेत तर तिची आई सरिता यादव या गृहिणी आहेत.शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर तिने २०१४मध्ये दिल्ली टेक्नॉलॉजिक युनिव्हर्सिटीमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. या शिक्षणानंतर, तिने सिस्को सिस्टम्स, बंगलोर येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून यशस्वीपणे नोकरी करण्यास सुरुवात केली.

नोकरीच्या ठिकाणी गल्लेलठ्ठ पगार होता पण या कामात तिचे मन रमत नव्हतं. तिने ती नोकरी सोडून IAS अधिकारी होण्याचा मार्ग निवडला. या निर्णयाला आई – वडिलांनी विरोध केला नाहीतर तिच्या आकांक्षांना पाठिंबा दिला. यामुळे ती युपीएससी परीक्षेचा अभ्यास करू शकली. फक्त परीक्षा दिली नाहीतर देशात सहावी आली.तिचा हा चिकाटी आणि स्वप्नांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे.

Share This Article