⁠
Uncategorized

दररोज फक्त 50 हजार भाविकांना वैष्णोदेवी दर्शन

राष्ट्रीय हरित लवादाने वैष्णोदेवीच्या दर्शनाबद्दल महत्त्वाचा आदेश दिला आहे. त्यानुसार आता दररोज फक्त 50 हजार भाविकांनाच दर्शनाची परवानगी देता येणार आहे. भाविकांची संख्या जर वाढली तर त्यांना अर्धकुमारी किंवा कटरामध्येच थांबवले जाणार आहे. तसेच मंदिर परिसरात नव्या बांधकामांवरही बंदी घालण्यात आली आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी 24 नोव्हेंबरपासून नवी पायी रस्ता सुरू करण्याचे तसेच प्रवाशांसाठी इलेक्ट्रिक कार सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मंदिर व्यवस्थापनाच्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये याठिकाणी एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी दर्शन केले होते. वैष्णो देवी श्राइन बोर्डच्या वेबसाइटनुसार गेल्या काही वर्षांत भाविकांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आंकडेवारीचा विचार करता 1986 मध्ये येथे येणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 14 लाख होती. ती 2012 मध्ये एक कोटींपेक्षा जास्त (104 लाख) झाली. 2013 मध्ये एकूण 93 लाख भाविकांनी दर्शन घेतले. 2014 मध्ये सुमारे 78 लाख, 2015 मध्ये 78 लाखांहून अधिक आणि 2016 मध्ये 77 लाखांहून अधिक लोकांनी दर्शन घेतले

Related Articles

Back to top button