सध्या झोमॅटोवरील एक ट्विट जबरदस्त गाजतंय “drop a like for Vignesh, who just cleared Tamil Nadu Public Service Commission Exam while working as a Zomato delivery partner”
खरं आहे…विघ्नेशची कहाणी घरा-घरात पोहोचली आहे. त्याच्या या यशाबद्दल सोशल मीडिया यूजर्सकडून अभिनंदन होत आहे. विघ्नेश हा मूळ तामिळनाडूचा रहिवासी आहे. घराची परिस्थिती बेताची असल्याने काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. पण किती दिवस हे असं काम करत राहणार? हा प्रश्न सतावत होतं होता. दु:ख असलं तरी जिंदगीच्या शाळेत मार्ग मिळतोच म्हणून विघ्नेशने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दिवसभर काम करायचं आणि यातून अभ्यास करायचा हे नियोजन करत तो राज्यातील अवघड परीक्षा पास झाला.
त्याआधी विघ्नेश एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या उपचारासाठी पैशांची जमवाजमव करताना कंपनीकडे पैशांच्या मदतीची मागणी केली. परंतू त्याला कंपनीने नकार दिला. याच दरम्यान त्याच्या लक्षात आले की, सरकारी नोकरी असेल तर आपले सर्व स्वप्न पूर्ण होतील. काळानंतरने त्याने बॅकिंग सेक्टरमधलेही नोकरी केली. पण मन काही रमेना म्हणून नोकरी सोडल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.
या परिस्थितीतून सर्व काही रुळावर आल्यानंतर विघ्नेशने सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. लहानपणीपासून त्याच्या पालकांची इच्छा होती की त्याने सरकारी नोकरी करावी. त्यांचे स्वप्न पूर्ण करावे म्हणून त्याने कठोर अभ्यास केला आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रचंड घेतली. पण नुसता अभ्यास करून घरचे भागत नसल्याने त्याने झोमॅटोमध्ये पार्ट टाईम नोकरी करत अभ्यास केला. आज तो ‘द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड’मध्ये प्रशासकीय अधिकारी या पदावर आहे.