एकूण जागा : ०३
पदांचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : १२ डिसेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : ५०० रुपये /-
वेतनमान (Pay Scale) : १५,९००/- रुपये
नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : १२ मार्च २०२१
निवड पद्धती :
अ) डाटा एन्ट्री ऑपरेटर्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास इ. १० वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि इ. १२ वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची सरासरी काढण्यात येईल. तसेच, एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला १० गुण बोनस देण्यात येतील.
ब) अनु. “अ” मध्ये विषद केल्याप्रमाणे गुणांकन करुन उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परीक्षेकरिता एका पदासाठी गुणानुक्रमे १२ उमेदवार याप्रमाणे बोलावण्यात येईल. सदर उमेदवारांची मराठी टायपिंग- ३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग- ४० शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल. यासाठी सर्व मिळून १०० गुण देण्यात येतील. सदर प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये किमान ५० गुण प्राप्त होणारे उमेदवार “डेटा एन्ट्री ऑपरेटर” या पदावरील निवडीसाठी पात्र राहतील.
क) उमेदवारास संगणक परीक्षेमध्ये मिळालेले गुण (१०० पैकी) व अनु. क्र. “अ” प्रमाणे शैक्षणिक पात्रतेबाबत मिळालेल्या गुणांची बेरीज करुन एकूण गुण देण्यात येतील व यानुसार उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याप्रमाणे तेवढ्याच पुढील उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
ड) सदर पदासाठी मुलाखत घेण्यात येणार नाही.
अधिकृत संकेतस्थळ : www.zplatur.gov.in
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा