सरन्यायाधीशपदी न्या. शरद अरविंद बोबडे विराजमान होणार
सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर न्या. शरद अरविंद बोबडे यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात यावे, असे शिफारसपत्र गोगोई यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाला लिहिले आहे. त्यामुळे बोबडे यांच्या रुपाने मराठी माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी विराजमान होणार आहे.
न्या. शरद अरविंद बोबडे यांच्याविषयी सविस्तर जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा.
ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धा : मनप्रीत, राणीकडे भारताचे नेतृत्व
भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे, तर महिला संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे सोपवण्यात आले आहे.
ओडिशा येथे रंगणाऱ्या या ऑलिम्पिक पात्रता फेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारतीय पुरुष संघाची लढत २२व्या क्रमांकावरील रशियाशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय महिलांसमोर १३व्या क्रमांकावरील अमेरिकेचे आव्हान असणार आहे.